Friday, July 11, 2025

स्वार्थ आणि अर्थ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

स्वार्थ आणि अर्थ

कुणाचा स्वैराराचार स्वातंत्र्य,
कुणाचे स्वातंत्र्य स्वैराचार आहे.
ज्याच्या त्याच्या सोयीनुसार,
ज्याचा त्याचा विचार आहे.

आपल्या सोयीनुसार विचार आहे,
आपल्या सोयीनुसारच अर्थ आहे.
जो बदलतो बघण्याचा दृष्टिकोन,
तो तर प्रत्येकाचाच स्वार्थ आहे ?

जो कालपर्यंत नालायक होता,
तोच आज अचानक नायक आहे !
आपल्या स्वार्थानुसार अर्थ लावणे,
हा दुटप्पीपणा धोकादायक आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------
फेरफटका-8974
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
11जुलै 2025
 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...