Saturday, July 12, 2025

तीन तिघाडे.....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

तीन तिघाडे.....

आधी म्हणाले,पन्नास खोके,
आता दाखवू लागले बॅगा.
संजयच्या दिव्य दृष्टीला,
काय काय दिसते ते बघा ?

कुणी वेठीस,कुणाला नोटीस,
कधी वाटते फिक्सिंग आहे.
जी मुद्द्यावरून गुद्द्यावर गेली,
ती तर चक्क बॉक्सिंग आहे.

तीन तिघाडे काम बिघाडे,
असेच राजकारण जारी आहे !
सगळ्या अडचणी वरचा उतारा,
वारीवर वारी दिल्ली वारी आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------
फेरफटका-8975
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
12जुलै 2025
 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...