Wednesday, July 2, 2025

वाढदिवस शुभेच्छा ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

वाढदिवस शुभेच्छा

हे लावतात डिजिटल बॅनर,
त्यांचा फक्त एखादा फोन येतो.
सांगा असल्या शुभेच्छा,
नेमका कुणाला कोण देतो?

कार्यकर्त्यांच्या वाढदिवसाला,
त्यांच्या नेत्यांचे गोडवे असतात.
लाळघोटे आणि पायचाटे तरी,
बॅनरवरती मात्र कडवे असतात.

बळचं शुभेच्छा घेतल्या जातात,
असे नाही की त्या दिल्या जातात !
अशा बळजबरीच्या शुभेच्छाच,
मीडियावर व्हायरल केल्या जातात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8965
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
2जुलै 2025
 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...