Monday, July 28, 2025

जातीय अहंकार....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

जातीय अहंकार

जात जातीला बोलू लागली,
जात जातीला कोलू लागली.
इतरांना हलके ठरवीत,
जात नाकाने कांदे सोलू लागली.

पुढे पुढे जायचे सोडून,
जात मागे मागे जाऊ लागली.
एकमेकांशी तुलना करताना,
जात माती खाऊ लागली.

परस्परांची जात काढून,
जातीला हिणवणे इष्ट नाही !
कुणी अभिमान बाळगला तरी,
जात काही कर्तृत्वाची गोष्ट नाही !

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------
फेरफटका-8990
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
28जुलै 2025
 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...