Thursday, July 24, 2025

नैतिक प्रश्न...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

नैतिक प्रश्न

मागितला तरी द्यायचा नाही
ही गोष्ट तर स्पष्ट झाली.
नैतिकता आणि राजीनामा,
ही इतिहास जमा गोष्ट झाली.

तरीही नैतिकतेच्या नावाने,
राजीनामा मागितला जातो.
जण सगळ्यांचाच अंत,
नैतिकतेकडून बघितला जातो.

अनैतिकतेच्या गर्दीमध्ये,
नैतिकतेचा दावा कशाला ?
अनैतिकच झाले नैतिक,
मग राजीनामा हवा कशाला ?

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------
फेरफटका-8986
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
24जुलै 2025
 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...