Sunday, July 27, 2025

क्लीन चीट....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

क्लीन चीट

कुणा कुणाला झिट आहे,
कुणाकुणाला वीट आहे.
सर्रास दिली घेतली जाते,
तिचे नाव क्लीन चीट आहे.

क्लीन चिट मिळली जाते
क्लीन चीट मिळवावी लागते.
सहज मिळाली नाही तर,
क्लीन चीट पळवावी लागते.

क्लीन चीट मिळेलपर्यंत,
सगळा खेळ उधार असतो !
अंधारलेल्या भविष्याला,
क्लीन चिटचा आधार असतो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------
फेरफटका-8989
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
27जुलै 2025
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...