Tuesday, July 29, 2025

अर्बनवादी ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

अर्बनवादी

पूर्वी कार्बन कॉप्या निघायच्या,
आता अर्बन कॉप्या काढू लागले.
आपण वैचारिक अर्बन आहोत,
नव्या नव्या अफवा सोडू लागले.

कुणी विचारांचे समर्थक,
कुणी कुणी विचाररोधी आहेत.
अमुक अर्बन;तमुक अर्बन,
जणू सगळेच अर्बनवादी आहेत.

कुठे वैचारिक उथळता आहे,
कुठे वैचारिक खळखळाट आहे !
हल्ली तिकडे बघावे तिकडे,
अर्बनवाद्यांचा सुळसुळाट आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
फेरफटका-8991
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
29जुलै 2025
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...