Monday, July 21, 2025

आदरपूर्वक सांगतो...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

आदरपूर्वक सांगतो...

कालपर्यंत तरी बरे होते,
आता मात्र उलटेच व्हायला लागले.
कुणाचा एकेरी उल्लेख करताच,
ते हमरी तुमरीवर यायला लागले.

एकेरी संबोधनात आत्मीयता होती,
एकेरी संबोधनात आत्मीयता आहे.
तिथे आहो जाहो करायचे कशाला?
जिथे जिथे मनात आत्मीयता आहे.

मनात खरा आदर पाहिजे,
मन चंगा तो कटोरीमे गंगा आहे !
ज्याच्या ज्याच्या मनात पाप,
त्याच्याकडूनच आज दंगा आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------
फेरफटका-8983
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
21जुलै 2025
 

No comments:

ऑपरेशन तुडवा ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- ऑपरेशन तुडवा जाणारा म्हणतो मी कडवा आहे, राहिलेला म्हणतो मीच कडवा आहे. ऑपरेशन टायगरला उत्तर म्हणून, आता म...