आजची वात्रटिका
-------------------
अमंगळ सूत्र
लोकशाहीच्या सभागृहात,
गुंड आणि झुंडशाहीचे स्तवन.
विधिमंडळ स्वतःशीच म्हणाले,
माझेच विधान मलाच भवन.
तेव्हा बिहार स्वतःशी पुटपुटले,
हे कॉपी-पेस्ट असे चित्र आहे.
राजकारणी आणि गुन्हेगारांमध्ये,
अत्यंत अमंगळ असे सूत्र आहे.
महाराष्ट्र मनापासून तळतळला,
कुणीही कसेही रंग देऊ शकतो !
गुंडागर्दीवर कुणी बोलाल तर,
तुमच्यावर हक्कभंग येऊ शकतो !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------
फेरफटका-8980
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
18जुलै 2025

No comments:
Post a Comment