साप्ताहिक वात्रटिका
----------------------
मराठी विजय मेळावा
हिंदीत सांगू की मराठीत?
ज्याचा त्याला अर्थ कळावा.
हिंदी विरोधातल्या मोर्चाचा,
झाला विजयी मेळावा.
मराठीच्या अभिजात दर्जाचे,
उगीचच तीन तेरा आहेत.
त्रिभाषा सूत्राच्या बाबतीत,
तिघांच्या तीन तऱ्हा आहेत.
विजयाची उभारली गुढी,
टाळी वाजण्याच्या बेतात आहे !
पहिलीपासूनच्या हिंदीचे भविष्य,
आता अर्थतज्ञाच्या हातात आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------
साप्ताहिक सरकारनामा
5जुलै 2025
No comments:
Post a Comment