आजची वात्रटिका
-------------------
डावे उजवे
जसे कुणी उजवे आहेत,
तसे कुणी डावे आहेत.
सगळ्यांचे वैचारिक मतभेद,
सगळ्यांनाच ठावे आहेत.
वैचारिक बुद्धिभेद करून,
सतत हरवता येत नाही.
आपल्या सोयीचे निकष लावून,
डावे उजवे ठरवता येत नाही.
जसा उजवा डावा असतो,
तसा डावाही उजवा असतो !
कितीही चमचमला तरी,
काजवा तो काजवा असतो !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8978
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
16जुलै 2025

No comments:
Post a Comment