Sunday, July 20, 2025

हात चलाखी....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------
हात चलाखी
खायचे आणि दाखवायचे,
वेगवेगळे दात असतात.
म्हणूनच राजकारणामध्ये,
अनेक डगरीवर हात असतात.
प्रासंगिक गरज ओळखून,
हात बाजूला सारला जातो.
जो चांगला हाताळता येईल,
त्याचाच हात धरला जातो.
केला इशारा येता जाता,
सगळे डोळा चुकवून केले जाते!
लक्षण असो वा अवलक्षण,
दोन्हीही हात दाखवून केले जाते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------
फेरफटका-8982
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
20जुलै 2025

 

No comments:

ऑपरेशन तुडवा ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- ऑपरेशन तुडवा जाणारा म्हणतो मी कडवा आहे, राहिलेला म्हणतो मीच कडवा आहे. ऑपरेशन टायगरला उत्तर म्हणून, आता म...