Sunday, January 24, 2021

दमछाक

आजची वात्रटिका
----------------------------
दमछाक
नेत्यांची घसरते जीभ,
कारण ते घसराळू असतात.
लोकही विसरून जातात,
कारण ते विसराळू असतात.
घसराळू आणि विसराळूची,
पक्की जोड जमली आहे!
आंधळी कोशिंबीर खेळून,
जनता पार दमली आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------------
फेरफटका-7505
दैनिक झुंजार नेता
24जानेवारी2021

 

राजकीय समानता

आजची वात्रटिका ----------------------------

राजकीय समानता

राजकारणी म्हटले की, खूप काही सोसावे लागते. कुणाला सत्तेवर तर, कुणाला विरोधात बसावे लागते.

कितीही मतभेद असले तरी, सत्ताकांक्षा मात्र  एक असते ! समाजकारणासाठी राजकारण, ऐकण्यापुरतेच ठीक  असते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ---------------------------- चिमटा-6041 दैनिक पुण्यनगरी 24जानेवारी2021

 

Saturday, January 23, 2021

बकासुराची न्यूज

आजची वात्रटिका
----------------------------
बकासुराची न्यूज
न्यूज चॅनलच्या बकासुराला,
रोज नवे नवे खाद्य लागते.
खाद्यासोबत वाजवायला,
रोज नवे नवे वाद्य लागते.
खाद्य आणि वाद्य मिळताच,
टार्गेट साध्य केले जाते !
नको नको ते बघायला,
प्रेक्षकांना बाध्य केले जाते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-6040
दैनिक पुण्यनगरी
23जानेवारी2021

 

किडा



आजची वात्रटिका
----------------------------
किडा
काल एक चिन्ह असते,
आज दुसरे चिन्ह असते.
लोकांची मजबुरी बघून,
लोकशाही खिन्न असते.
दरवेळी नव्या चिन्हासह,
परस्परांशी लढा असतो!
आपणच लोकशावादी,
आपल्यालाच किडा असतो !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------------
फेरफटका-7504
दैनिक झुंजार नेता
23जानेवारी2021

 

दैनिक वात्रटिका अंक 88वा


दैनिक वात्रटिका
अंक 88वा
22जानेवारी2021
डाऊनलोड लिंक

Friday, January 22, 2021

लॉजिकचे मॅजिक

आजची वात्रटिका
----------------------------

लॉजिकचे मॅजिक

आपण मुख्यमंत्री व्हावे, ही इच्छा सहाजिक असते. ज्याच्या त्याच्या इच्छेमागे, ज्याचे त्याचे लॉजिक असते.

पोटातले ओठावर आणायला, योग्य कारण धुंडले जाते ! संधी साधूनच मग, आपले लॉजिक मांडले जाते !

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ------------------------------------- फेरफटका-7503 दैनिक झुंजार नेता 22जानेवारी2021

 

गदारोळ

आजची वात्रटिका
----------------------------
गदारोळ
रोज कसली तरी वरात,
रोज कसला तरी मांडव आहे.
आपापल्या गदारोळाचे,
रोज तांडव एके तांडव आहे.
सामाजिक अस्थिरतेचे,
हे सगळे दाखले आहेत!
कर्ते आणि करविते,
त्यावरच तर सोकले आहेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-6039
दैनिक पुण्यनगरी
22जानेवारी2021

 

दैनिक वात्रटिका 21 जानेवारी2021

दैनिक वात्रटिका
21 जानेवारी2021
डाऊनलोड लिंक

 

Thursday, January 21, 2021

गावाकडच्या गोष्टी

आजची वात्रटिका
----------------------------
गावाकडच्या गोष्टी
स्थानिक राजकारणाची,
वेगळीच ख्याती आहे.
चांगल्या चांगल्या लोकांची,
त्यांच्या गावातच माती आहे.
दिल्लीपेक्षा गल्लीचे,
राजकारण कोडगे आहे !
गावा-गावाच्या वेशीवर,
लोकशाहीचे थडगे आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------------
फेरफटका-7502
दैनिक झुंजार नेता
21जानेवारी2021

 

दैनिक वात्रटिका 20जानेवारी2021

डाऊनलोड लिंक
 

Wednesday, January 20, 2021

भावनिक दुखवटे

 

आजची वात्रटिका
----------------------------

भावनिक दुखवटे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर, कसला तरी मुखवटा आहे. रोजच भावना दुखवून, भावनिक दुखवटा आहे.

भावनिक दुःखवट्यांना, रोज नव्याने भरती आहे ! स्टंटबाज लोकांची, जणू ही इच्छापूर्ती आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ---------------------------------------- चिमटा-6037 दैनिक पुण्यनगरी 20जानेवारी2021

भावनिक दुखवटे

आजची वात्रटिका
----------------------------
भावनिक दुखवटे
प्रत्येकाच्या चेहऱ्यावर,
कसला तरी मुखवटा आहे.
रोजच भावना दुखवून,
भावनिक दुखवटा आहे.
भावनिक दुःखवट्यांना,
रोज नव्याने भरती आहे !
स्टंटबाज लोकांची,
जणू ही इच्छापूर्ती आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-6037
दैनिक पुण्यनगरी
20जानेवारी2021


दैनिक वात्रटिका 19जानेवारी2021

दैनिक वात्रटिका
19जानेवारी2021

 

Tuesday, January 19, 2021

ग्रामपंचायत 2021

आजची वात्रटिका
----------------------------
ग्रामपंचायत 2021
गल्ली आणि दिल्ली,
कुठे सारखी आहे?
दिल्लीपेक्षा गल्ली,
जास्तच बेरकी आहे.
कुणी उजवे आहेत,
कुणी डावे आहेत.
नंबर वन असल्याचे,
सर्वांचे दावे आहेत.
गावोगावचे पॅनल,
चॅनलवर झळकू लागले !
पॉलिटीकल बेसिक,
प्रथमच ओळखू लागले !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6036
दैनिक पुण्यनगरी
19जानेवारी2021

 

ग्रामपंचायतचे हिरो

आजची वात्रटिका
----------------------------

ग्रामपंचायतचे हिरो

कुणी तरी नेक आहेत, कुणी तरी फेक आहेत, हे कसे खरे असेल? सगळेच नंबर एक आहेत?

हिरोचे झिरो बनले, झिरोचर हिरो झालेआहेत ! एक नंबरी आणि दोन नंबरी, पक्के लक्षात आले आहेत!!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ------------------------------------- फेरफटका-7501 दैनिक झुंजार नेता 19जानेवारी2021

 

Monday, January 18, 2021

दैनिक वात्रटिका 18जानेवारी2021

दैनिक वात्रटिका
18जानेवारी2021
डाऊनलोड लिंक

 

सत्तासूत्र

आजची वात्रटिका
----------------------------
सत्तासूत्र
सत्तेसाठी नेकीची नाही,
फक्त एकीची गरज असते.
इथे शब्द पाळतो कोण?
फेकफेकीची गरज असते.
जसे धोकेबाज चालतात,
तसे फेकेबाज हवे असतात.
आकड्यांची जुळणीसाठी,
पक्के डोकेबाज हवे असतात.
कान-डोळे झाकून घेऊन,
थोडे कोडगे व्हावे लागते !
उतरंड कोसळू नये म्हणून,
पक्के गाडगे व्हावे लागते !
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-6035
दैनिक पुण्यनगरी
18जानेवारी2021

 

ग्रामपंचायत लिमिटेड

आजची वात्रटिका
----------------------------
ग्रामपंचायत लिमिटेड
कुणी रोख्याने दिल्या,
कुणी ठोक्याने दिल्या.
बिनविरोध ग्रामपंचायती,
मोठ्या डोक्याने दिल्या.
ग्रा.पं.च्या निवडणूकीचा,
हा प्रकार निराळा आहे !
निवडणूका झाल्या तिथे,
धुराळा एके धुराळा आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------------
फेरफटका-7500
दैनिक झुंजार नेता
18जानेवारी2021

 

दैनिक वात्रटिका 17जानेवारी2021

दैनिक वात्रटिका
17जानेवारी2021
अंक डाऊनलोड लिंक

 

Sunday, January 17, 2021

कोरोनाच्या हालचाली

आजची वात्रटिका
----------------------------
कोरोनाच्या हालचाली
आली आली म्हणता म्हणता,
आपल्यावरील लस आली.
याचा अर्थ असा नाही की,
आता आपली चढाई बस झाली.
काळ आपल्या बाजूने आहे,
होईल तसे पसरत चला !
माणसाला अक्कल आलीय,
हा गैरसमज विसरत चला !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------------
फेरफटका-7499
दैनिक झुंजार नेता
17जानेवारी2021

 

भावी नेतृत्त्व

आजची वात्रटिका
----------------------------
भावी नेतृत्त्व
किती भावींची झोप उडाली,
याचा काही मोप नाही.
कित्येक भावी सरपंचांना,
गावागावात झोप नाही.
स्वतःबरोबर इतरांच्याही
त्यांनी झोपा उडवल्या आहेत !
सोशल मीडियाने
अनेक भावी नेत्यांच्या,
पिढ्या घडवल्या आहेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6034
दैनिक पुण्यनगरी
17जानेवारी2021

 

स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...