Monday, May 3, 2021

नाते आणि गोते

आजची वात्रटिका
---------------------

नाते आणि गोते

भुकेलेल्यावर आहे,
खात्या-पित्यावर आहे.
कोरोनाचा कहर,
नात्या-गोत्यावर आहे.

कोरोनाचा सुंभ जळेल,
नात्या-गोटात पीळ ठेवू नका!
एकदिलाने जमेल तसे लढा,
कोरोनाला शरण जाऊ नका !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------------
फेरफटका-7586
दैनिक झुंजार नेता
3मे2021

 

कोरोना लॉबी


आजची वात्रटिका
---------------------
कोरोना लॉबी
वाईट तर होताच,
त्याहून तो गंदा झाला.
कोरोना नावाचा रोग
जबरदस्त धंदा झाला.
कोरोनाहूनही वाईट,
समस्या समोर उभी आहे!
कोरोनापेक्षा वेगाने पसरतेय,
ती कोरोना लॉबी आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6135
दैनिक पुण्यनगरी
3मे2021 

Friday, April 30, 2021

काव्य इन्फेक्शन

 

काव्य इन्फेक्शन,आजची वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

काव्य इन्फेक्शन

तू माझा मास्क,
तू माझा पीपीई कीट पण आहे.
मी तुझा सिलेंडर,
तू माझा ऑक्सिजन आहे.

आशा चारोळ्या-बिरोळ्या
आरोळ्या लिहिल्या जात आहेत !
कोरोनाचे दुष्परिणाम असे,
काव्य विश्वावर होत आहेत !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6133
दैनिक पुण्यनगरी
30एप्रिल2021

 

Thursday, April 29, 2021

सॅनिटायझरची नशा

आजची वात्रटिका
---------------------

सॅनिटायझरची नशा

कोरोनाच्या तडाख्यात,
सगळे विचित्र होऊ लागले.
दारू मिळेना म्हणून पेताड,
सॅनिटायझर पिऊ लागले.

सॅनिटायझरचे कॉकटेल,
याला अजिबात तोड नाही!
सॅनिटायझरची नशा चढताच,
जगण्याचाही लोड नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6132
दैनिक पुण्यनगरी
29एप्रिल2021

 

लसीकरण मोहीम

आजची वात्रटिका
---------------------

लसीकरण मोहीम

मोफतच्या लसीचे वय,
असेच खाली खाली येवो.
कोरोना आहे तोपर्यंत तरी,
शंभर टक्के लसीकरण होवो .

कोरोना गेला,लसीचा डोस दिला,
उद्या अशी म्हणही पडू शकते!
टार्गेट पूर्ण करण्यासाठी,
भविष्यात हेही घडू शकते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7583
दैनिक झुंजार नेता
29एप्रिल2021

 

Wednesday, April 28, 2021

बॅटचे बोल

आजची वात्रटिका
---------------------

बॅटचे बोल

आउट डोअरचे प्रेक्षक,
कोरोनाने इनडोअर झाले.
प्रेक्षकांशिवाय खेळताना,
मला तर बाई बोअर झाले.

प्रेक्षकांत आणि आपल्यात,
खूप सोशल डिस्टनसिंग आहे !
आऊटडोअरपेक्षा इनडोअरमध्ये,
एक वेगळीच झिंग आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7582
दैनिक झुंजार नेता
28एप्रिल2021

 

टीका आणि टिंगल

आजची वात्रटिका
---------------------

टीका आणि टिंगल

टीका-टिप्पणी जरूर व्हावी,
पण टिंगल टवाळी नको.
जीभेत लवचिकता असावी,
पण धारदार अन लव्हाळी नको.

उचला आणि लावा टाळ्याला,
हे सर्वांनी टाळले पाहिजे !
टीका आणि टवाळकी,
यातले अंतर कळले पाहिजे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6131
दैनिक पुण्यनगरी
28एप्रिल2021

 

लपाछपीचा खेळ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- लपाछपीचा खेळ समाजकारणाआडचे राजकारण, लपविणे नेहमीच जड होत जाते. समाजकारणाआडचे राजकारण, कधी ना कधी उघड होत...