Monday, August 9, 2010

ढगफुटी

ढगफुटी आपल्याला नवी नाही
नेते सुसाट सुटत असतात.
आश्वासनांचे असेच ढग
प्रचारामध्ये फुटत असतात.

मतांच्या जोगव्यासाठी
पसरलेली परडी असते!
आश्वासनांची ढगफुटी
ओली नाही,कोरडी असते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

दैनिक वात्रटिका l 7 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 308 वा l पाने -57

आजचा अंक दैनिक वात्रटिका l 7 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 308 वा l पाने -57 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1X587Lgf5...