Tuesday, August 31, 2010

तोडपाणी

हे दिवसच जणू
परस्परांची स्तुती गाण्याचे आहेत.
नीट पाहिले की कळते,
हे दिवसच तोडपाण्याचे आहेत.

कुठे उघड,कुठे छुपे
सोईप्रमाणे तोडपाणी आहे !
जनतेला सांगायची गरज नाही
जनता तर सर्वज्ञानी आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

daily vatratika...27nove2024

दैनिक वात्रटिका l 26नोव्हेंबर2024  वर्ष- चौथे अंक - 177 वा l पाने -42 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1Ax5QQDeS9QXcf6NK4...