Saturday, February 19, 2011

होम-क्रिकेट

पोरांची बॅटींग जोरदार,
त्यांचा रन मागे रन असतो.
आईची फिल्डिंग ढिल्ली,
बाप तर ’नाईट वॉचमन’ असतो.

घरातल्या घरामध्ये
असे क्रिकेटचे मॅच होतात !
पिचचा अंदाज आला नाही की,
पोरांचे मग कॅच जातात !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

दैनिक वात्रटिका l 27नोव्हेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 178 वा

दैनिक वात्रटिका l 27नोव्हेंबर2024  वर्ष- चौथे अंक - 178 वा l पाने -42 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1Bz42D4tcH39dHS6r6...