Saturday, March 19, 2011

शिमग्याचा इशारा

ज्यांच्या पिकायच्या त्यांच्याच
पिकलेल्या पोळ्या असतात.
बाकीच्यांचा बारामाही शिमगा,
बारामाही होळ्या असतात.

व्यवस्थेविरूद्ध लढले की,
उगीच पोटशूळ उठले जाते.
वेदनेच्या आक्रोशालाही
बोंबलणे म्हटले जाते.

ही धगधगती आग अशी की,
अंत:करण चेतले पाहिजे !
होळीचा वणवा होण्याआधीच
आक्रोशाला समजून घेतले पहिजे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

daily vatratika...29nove2024