पाठिंबा फुकट मिळत नाही,
पाठींबा विकत घ्यावा लागतो.
कधी रोखीने,कधी उधारीवर
त्याचा मोबदला द्यावा लागतो.
हा खरेदी-विक्रीचा व्यवहार
हल्ली लोकमान्य आहे !
नैतिक-अनैतिकतेचा विचार
इथे व्यवहारमान्य आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
Sunday, September 30, 2012
Saturday, September 29, 2012
खरा घोटाळा
नको तिथे पाणी मुरून
राजीनामा मोठा झाला.
पुतण्यापेक्षा काका
बघता बघता छोटा झाला.
कार्यकर्त्यांच्या हाती बघा
कुणाचा फलक आहे?
उद्याच्या राजकारणाची
ही फक्त झलक आहे !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
राजीनामा मोठा झाला.
पुतण्यापेक्षा काका
बघता बघता छोटा झाला.
कार्यकर्त्यांच्या हाती बघा
कुणाचा फलक आहे?
उद्याच्या राजकारणाची
ही फक्त झलक आहे !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
Friday, September 28, 2012
जाहिर जाळा-जाळी
हे त्यांचे पुतळे जाळू लागले,
ते ह्यांचे पुतळे जाळू लागले.
निष्ठादर्शनाच्या अतिरेकापोटी
जाहिर जाळा-जाळी खेळू लागले.
घोटाळ्यांच्या आरोप-प्रत्यारोपानंतर
जाळाजाळीचे काव्य आहे !
जणू एकमेकांच्या नेत्यांचे
कार्यकर्त्यांकडून ’अग्निदिव्य’ आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
ते ह्यांचे पुतळे जाळू लागले.
निष्ठादर्शनाच्या अतिरेकापोटी
जाहिर जाळा-जाळी खेळू लागले.
घोटाळ्यांच्या आरोप-प्रत्यारोपानंतर
जाळाजाळीचे काव्य आहे !
जणू एकमेकांच्या नेत्यांचे
कार्यकर्त्यांकडून ’अग्निदिव्य’ आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
Thursday, September 27, 2012
Wednesday, September 26, 2012
राजीनाम्याचे ’शास्त्री’य विश्लेषण
आमचे विश्लेषलण काही
खपल्या खरवडणारे नाही.
पण राजीनाम्याचा आदर्श ठेवणे
पक्षाला परवडणारे नाही.
धक्कादायक निर्णयामागे
नैतिकतेचा सूर आहे.
वडिलधारेही बोलू लागले,
आमचा लाल बहादूर आहे.
आरोपांना आणि राजीनाम्यालाही
तसा’शास्त्री’य आधार आहे !
भूतकाळ आणि वर्तमानही सांगेल,
आमचे विश्लेषण साधार आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
खपल्या खरवडणारे नाही.
पण राजीनाम्याचा आदर्श ठेवणे
पक्षाला परवडणारे नाही.
धक्कादायक निर्णयामागे
नैतिकतेचा सूर आहे.
वडिलधारेही बोलू लागले,
आमचा लाल बहादूर आहे.
आरोपांना आणि राजीनाम्यालाही
तसा’शास्त्री’य आधार आहे !
भूतकाळ आणि वर्तमानही सांगेल,
आमचे विश्लेषण साधार आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
Tuesday, September 25, 2012
व्यवस्था शुद्धीकरण
व्यवस्था शुद्धीकरण
व्यवस्थेच्या शुद्धीकीरणाला
जेंव्हा सिद्ध व्हावे लागते.
त्याची पहिली अट अशी की,
प्रथम स्वत: शुध्द व्हावे लागते.
असा शुद्ध माणूस म्हणजे
वाळवंटातील हिरवळ असतो !
अश्या माणसाच्या अवती-भोवती
नेहमी न्यायाचा दरवळ असतो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
असा शुद्ध माणूस म्हणजे
वाळवंटातील हिरवळ असतो !
अश्या माणसाच्या अवती-भोवती
नेहमी न्यायाचा दरवळ असतो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
Monday, September 24, 2012
Sunday, September 23, 2012
Saturday, September 22, 2012
Friday, September 21, 2012
Thursday, September 20, 2012
लोकपाल आणि देहत्याग
कुणाला वाटेल नैराश्याची,
कुणाला वाटेल रागाची आहे.
अण्णांची नवी भूमिका
लोकपालासाठी देहत्यागाची आहे.
नवी टीम,नवी भूमिका,
टीम कुणा एकाची नको !
विचारात ’टीम वर्क’दिसावे
भूमिकाही टॊकाची नको !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
कुणाला वाटेल रागाची आहे.
अण्णांची नवी भूमिका
लोकपालासाठी देहत्यागाची आहे.
नवी टीम,नवी भूमिका,
टीम कुणा एकाची नको !
विचारात ’टीम वर्क’दिसावे
भूमिकाही टॊकाची नको !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
Wednesday, September 19, 2012
हौतात्म्याची संधी
ममता बॅनर्जी काया करतात
तेच आता पहायचे आहे.
नाही तरी सरकारला
हुतात्मा व्हायचे आहे.
कधी वाटते कठोरता,
कधी वाटते सत्तेची धुंदी आहे !
सरकारने ’हुतात्मा’ होण्यासाठी
निर्माण केलेली संधी आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
तेच आता पहायचे आहे.
नाही तरी सरकारला
हुतात्मा व्हायचे आहे.
कधी वाटते कठोरता,
कधी वाटते सत्तेची धुंदी आहे !
सरकारने ’हुतात्मा’ होण्यासाठी
निर्माण केलेली संधी आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
Tuesday, September 18, 2012
पब्लिक मेमरी
काय विसरावे?काय आठवावे?
याचेही एक आर्ट असते.
पब्लिकची मेमरी
नेहमीच शॉर्ट असते.
मेमरी शॉर्ट असली तरी
आठवायचे ते आठवत असते!
विसराळूपणाची भूमिका
जनता हुबेहूब वठवत असते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
याचेही एक आर्ट असते.
पब्लिकची मेमरी
नेहमीच शॉर्ट असते.
मेमरी शॉर्ट असली तरी
आठवायचे ते आठवत असते!
विसराळूपणाची भूमिका
जनता हुबेहूब वठवत असते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
Monday, September 17, 2012
Sunday, September 16, 2012
Saturday, September 15, 2012
अखेरचा निर्धार
वॉशिंग्टन पोस्टचे ताशेरे
भलतेच मनाला लावले गेले.
धक्कादायक निर्णयांमुळे
सरकारही पणाला लावले गेले.
हवालदिल जनतेचा
महागाईकडून पिच्छा आहे !
सरकारची रडत-रडत जाण्यापेक्षा
लढत-लढत जायची इच्छा आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
भलतेच मनाला लावले गेले.
धक्कादायक निर्णयांमुळे
सरकारही पणाला लावले गेले.
हवालदिल जनतेचा
महागाईकडून पिच्छा आहे !
सरकारची रडत-रडत जाण्यापेक्षा
लढत-लढत जायची इच्छा आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
Friday, September 14, 2012
सातवा सिलेंडर
किती गेले?किती राहिले?
समोर आता कॅलेंडर ठेवा.
महागाईला तोंड देताना
डॊक्यात सातवा सिलेंडर ठेवा.
कॅलेंडर आणि सिलेंडरची
आता नव्याने जोडणी आहे !
सबसिडीशिवाय सिलेंडर म्हणजे
महागाईची फोडणी आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
समोर आता कॅलेंडर ठेवा.
महागाईला तोंड देताना
डॊक्यात सातवा सिलेंडर ठेवा.
कॅलेंडर आणि सिलेंडरची
आता नव्याने जोडणी आहे !
सबसिडीशिवाय सिलेंडर म्हणजे
महागाईची फोडणी आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
Thursday, September 13, 2012
व्यंगातील सकारात्मकता
वात्रटिकेतले असो वा चित्रातले
व्यंग हे व्यंग असते.
लोकांच्या नजरेस आणून देणरे
हे सामाजिक भिंग असते.
तुच्छता नाही,नकार नाही,
व्यंगाला व्यवस्थित आकार असतो !
जे जे उदात्त,जे जे उत्तम,
सुंदरतेला सकार असतो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
व्यंग हे व्यंग असते.
लोकांच्या नजरेस आणून देणरे
हे सामाजिक भिंग असते.
तुच्छता नाही,नकार नाही,
व्यंगाला व्यवस्थित आकार असतो !
जे जे उदात्त,जे जे उत्तम,
सुंदरतेला सकार असतो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
Wednesday, September 12, 2012
संमेलनाची वादप्रियता
साहित्य संमेलन निर्विवाद झाले
हे काही मनाला पटत नाही.
वाद झाले नाहीत तर
संमेलन संमेलन वाटत नाही.
संमेलनापेक्षा वादच
कितीतरी गाजले जातात !
साहित्यिकांची वादावादी बघून
रसिक बिचारे लाजले जातात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
गिधाडांचे टीमवर्क
चारा खाल्ला, वाळू खाल्ली,
कोळसाही खाल्ला आहे,
देशाच्या साधनसंपत्तीवर
पांढर्या गिधाडांचा हल्ला आहे
जे दिसेल ते खात राहा
सर्वच क्षेत्रांचा विचका आहे!
गिधाडे गिधाडांना सामील
इथेच खरा पचका आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Tuesday, September 11, 2012
व्यंगचित्र आणि देशद्रोह
संसदेचा होणारा अपमान
तुम्ही आम्ही पाहिला आहे.
अजून कसला देशद्रोह
इथे व्हायचा राहिला आहे?
व्यंगचित्राने देशद्रोह कसा होतॊ?
हेच काही उमजत नाही !
खरे दुर्दैव असे की,
चित्रातले खरे ’व्यंग’ समजत नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
तुम्ही आम्ही पाहिला आहे.
अजून कसला देशद्रोह
इथे व्हायचा राहिला आहे?
व्यंगचित्राने देशद्रोह कसा होतॊ?
हेच काही उमजत नाही !
खरे दुर्दैव असे की,
चित्रातले खरे ’व्यंग’ समजत नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
Monday, September 10, 2012
अंगार्याचा चमत्कार
कुणाच्या फोटोतून काही
उगीच अंगारा गळत नाही.
आंधळ्या भक्तीला
हातचलाखीही कळत नाही.
उरल्या-सुरल्या अकलेलाही
डोळ्यादेखत गुंगारा असतो !
नाही तरी राख म्हणजेच
चमत्कारीक अंगारा असतो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
उगीच अंगारा गळत नाही.
आंधळ्या भक्तीला
हातचलाखीही कळत नाही.
उरल्या-सुरल्या अकलेलाही
डोळ्यादेखत गुंगारा असतो !
नाही तरी राख म्हणजेच
चमत्कारीक अंगारा असतो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
Sunday, September 9, 2012
मुद्दे आणि गुद्दे
कधी यांचा,कधी त्यांचा
मुद्दा पळवला जातो.
मुद्दा डोईजड झाला की,
गुद्दय़ाने मुद्दा वळवला जातो.
मुद्दय़ांपेक्षा गुद्दय़ांचेच
राजकारण प्रचलित होत आहे!
मुद्दे आणि गुद्दे बघून
जनता विचलित होत आहे!!
- सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
Saturday, September 8, 2012
संमेलन आणि वाद
जे काल-परवापर्यंत झाले
तेच आज पुन्हा होते आहे.
मराठी साहित्य संमेलनांचे
वादविवादाशी नाते आहे.
कधी वाद ओढावून घेतले जातात,
कधी वाद पेटवले जातात!
संमेलनाच्या फलनिष्पत्तीपेक्षा
वादच जास्त आठवले जातात!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Friday, September 7, 2012
बायकोचा पॉकिटमनी
बायकोला पॉकिटमनी म्हणून
लवकरच आता पगार आहे.
पुन्हा एकदा सिद्ध होईल
लग्न म्हणजे जुगार आहे.
या कायद्याचे तरंग
घरा-घरात उठले जातील !
ज्यांच्या बायका पगारदार
ते मात्र यातून सुटले जातील !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
Thursday, September 6, 2012
Wednesday, September 5, 2012
गुरुजीचे भूमिकांतर
गुरूजी उघडतात शाळा,
गुरूजीकडेच सफाई आहे.
शाळेची घंटा घणघणते
गुरूजी म्हणजे शिपाई आहे.
अमकी माहिती, तमकी माहिती
लिखाण एकसारखं आहे.
गुरूजीकडे बघून वाटतं
हा शाळेचा क्लर्क आहे.
हमाली करा,टपाली करा,
खिचडी,वरण-भात करत असतो.
आशावेळी बिचारा गुरूजी
आयता आचारी ठरत असतो.
शिक्षणाच्या कायद्याची
जिकडे-तिकडे दवंडी आहे.
शाळेतली बांधकामं सांगतात,
गुरूजी म्हणजे गवंडी आहे.
शिक्षण नावाच्या सर्कशीतला
शिक्षक एक जोकर झाला.
काहीही सांगा,कुणीही सांगा
शिक्षक सांगकाम्या नोकर झाला.
गुरूजीकडे राखुळीसाठी
दोन वर्गांचे आंदण असते.
गुरू साक्षात परब्रम्ह म्हणीत
गुरूजीला वंदन असते.
राजकीय व्यापार्यांचे
गुरूजीला सेलर व्हावे लागते.
मुलांच्या गणवेशापोटी
गुरूजीला टेलर व्हावे लागते.
समिती कुठलीही असो,
गुरूजीला सचिवाचा भाव येतो.
सांगेल तिथे करून
गुरूजीचा सह्याजीराव होतो.
नको तेवढ्या भूमिका
गुरूजीवर लादल्या जातात.
गुरूजीही काही कमी नाही
अनेक जोडधंदे साधल्या जातात.
आदर्शांचा आणि वास्तवचा
गुरूजी मेळ मागतो आहे.
मुलांना शिकविण्यासाठी
गुरूजी वेळ मागतो आहे.
गुरूजीला वापरले जाते,
गुरूजीला ढोपरले जाते.
गुरूजीतले गुरूजीपण
सोयिस्कर नाकारले जाते.
कुणीही येतो,
टिकली मारून जातो !
अशावेळी गुरूजीतला
गुरूजी मरून जातो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबा.९९२३८४७२६९
Tuesday, September 4, 2012
Monday, September 3, 2012
चिल्लर आणि पाटर्य़ा
चिल्या-पिल्यांचा दोष,
हा निष्कर्षच अर्धामुर्धा आहे.
चिल्लर पाटर्य़ा म्हणजे
संस्कारांचा खुर्दा आहे.
तुम्हा-आम्हाला वाटते
ही थिल्लर बाब आहे!
कुणाकुणाला अजूनही वाटते
पिणे ही चिल्लर बाब आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Sunday, September 2, 2012
Subscribe to:
Posts (Atom)
दैनिक वात्रटिका l 28मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 298वा l पाने -54
दैनिक वात्रटिका l 28मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 298वा l पाने -54 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1QFQFkgKdfL7eY4viFxy...

-
आजची वात्रटिका ---------------------- गेट-टुगेदर भूतकाळातले मित्र -मैत्रिणी, खूप वर्षानंतर भेटू लागले. उजळून येतात आठवणी, छोटे झाल्यासारखे व...