Wednesday, October 17, 2012

दुसर्‍या लग्नाची गोष्ट

नट-नट्यांचे लग्न
ही गोष्टच मनोरंजक असते.
डोळ्यासमोर ज्या  उभ्या राहतात
त्या प्रतिमांची ती भंजक असते.

नट-नट्यांच्या पाठीशी
लग्नाचा अनुभव दांडगा असतो !
लग्नाची भूक काही भागत नाही
नटी हांडगी,नट हांडगा असतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

No comments:

नेत्यांचे मित्र प्रेम...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- नेत्यांचे मित्र प्रेम राजकीय नेत्यांच्या मित्रांवरती, लोक उगीचच दात खात असतात. ते पुंडलिका वर दे...चा गजर...