Wednesday, October 3, 2012

टोपीवरचे नामांतर

कुणाचा चेहरा आशादायी,
कुणाचा चेहरा छद्मी आहे.
अण्णांच्या जाग्यावरती
आता ’आम आदमी’ आहे.

मार्ग वेगळा,उद्दीष्ट एक,
जरी टीम अण्णात दुही आहे !
चुकांमधून शिकत असल्याची
टीम अण्णाची ग्वाही आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)

No comments:

दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...