आश्वासनांवर आश्वासने
हीच आजची निती आहे.
थापाड्यांची आणि गप्पाड्यांची
आज राजकीय युती आहे.
थापा किती माराव्यात ?
यालाही काही माप नाही !
थापाड्या-गप्पाड्यांचीच चलती आहे
ही काही थाप नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...
No comments:
Post a Comment