Thursday, October 4, 2012

जयस्वालांचा ’स्त्री’प्रकाश

जयस्वालांनी ’स्त्री’प्रकाश टाकला,
बायको जुनी होत असते.
खरे तर आपण जुने झालो की,
ही शंका मनी येत असते.

बायकोला नवी-जुनी म्हणण्यात
कोणताही पुरूषार्थ नसतो !
मजे-मजेत बरळण्याला
तसा कोणताही अर्थ नसतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

No comments:

दैनिक वात्रटिका l 4 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 305वा l पाने -57

दैनिक वात्रटिका l 4 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 305वा l पाने -57 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1VDZIPmnz1bKXOaj5nbZ...