Tuesday, October 9, 2012

खरी ओळख

तुम्हांला जेंव्हा कधी
बिनव्याजी कर्ज मिळू शकते.
तेंव्हा तुम्ही कुणाचे जावई आहात
ते सार्‍या देशाला कळू शकते.

हा काही कुणा एकट्याचा
फार मोठा जावई शोध नाही!
तुम्ही ’आम आदमी’ नाहीत
याचा तुम्हांलाच कसा बोध नाही?

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

दैनिक वात्रटिका l 6 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 307 वा l पाने -57

आजचा अंक  दैनिक वात्रटिका l 6 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 307 वा l पाने -57 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1W9ND5N9la0-...