ते स्वत: निवडून येतात,
त्यांना निवडून देतो कोण?
निवडणूक नावाची प्रक्रिया
नीट समजून घेतो कोण?
निवडून यायची कला
ते कोळून प्यालेले आहेत !
लोकमान्यता असो वा नसो?
ते लोकप्रतिनिधी झालेले आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...
No comments:
Post a Comment