Sunday, October 21, 2012

खरे विजेते

जसा भ्रष्टा्चार केला जातो,
तसा तो करविला जातो.
व्यवस्थेच्या चक्रव्यूहात
प्रामाणिकपणा हरविला जातो.

काहीजण इच्छा नसताना खातात,
काहीजण मुळीच खात नाहीत !
ज्यांचा प्रामाणिकपणा हरत नाही,
ते व्यवस्थेला शरण जात नाहीत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...