Tuesday, October 23, 2012

सवयीचे गुलाम

हुजरेगिरी आणि मुजरेगिरी
एकमेकांच्या नकला आहेत.
जे सवयीचे गुलाम आहेत,
त्यांना कुठे याच्या अकला आहेत?

उरल्या-सुरल्या अकलाही
कुणाच्यातरी पायावर गहाण आहेत !
हुजर्‍या आणि मुजर्‍या
खरोखरच महान आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...