आजची वात्रटिका
------------------------
कवींचे गट
जे मंचावर गळे काढतात,
ते मंचीय कवी असतात.
व्वा क्या बात है वाले,
पक्के पंचीय कवी असतात.
कविता डोक्यावरून जाते,
ते उंचीय कवी असतात.
ज्यांची कविता मादक आणि टंच,
ते तर टंचीय कवी असतात.
ज्यांचा असतो कळप,
ते सर्व संचीय कवी असतात!
बियर आणि चिअर वाले,
ते बंचीय कवी असतात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6709
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
3फेब्रुवारी2023
Showing posts with label कवींचे गट...मराठी वात्रटिका. Show all posts
Showing posts with label कवींचे गट...मराठी वात्रटिका. Show all posts
Subscribe to:
Posts (Atom)
लपाछपीचा खेळ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका -------------------- लपाछपीचा खेळ समाजकारणाआडचे राजकारण, लपविणे नेहमीच जड होत जाते. समाजकारणाआडचे राजकारण, कधी ना कधी उघड होत...
-
वात्रटिका : वर वर एक हलकाफुलका विनोदी काव्यप्रकार वाटत असला तरी केवळ विनोद निर्मिती हे वात्रटिकेचे एकच आणि अंतिम कार्य नाही. पश्चिमी ‘लिम्...
