आजची वात्रटिका
--------------------------
घरगुती बजेट
आपल्या घराचे बजेट,
गृहमंत्र्याच्या हाती असते.
आपले बजेट गडगडू नये,
आपल्याला भीती असते.
अर्थमंतत्र्याला गृहमंत्र्याचा,
वेळोवेळी चेक असतो.
जरी आपला अर्थमंत्री अन,
गृहमंत्रीही एक असतो.
बचतीच्या मूलमंत्राला,
काटकसरीला ठसवले जाते !
तुटीच्या अर्थसंकल्पातही,
सगळे बजेट बसवले जातात!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6708
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
2फेब्रुवारी2023
Showing posts with label घरगुती बजेट....मराठी वात्रटिका. Show all posts
Showing posts with label घरगुती बजेट....मराठी वात्रटिका. Show all posts
Subscribe to:
Posts (Atom)
लपाछपीचा खेळ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका -------------------- लपाछपीचा खेळ समाजकारणाआडचे राजकारण, लपविणे नेहमीच जड होत जाते. समाजकारणाआडचे राजकारण, कधी ना कधी उघड होत...
-
वात्रटिका : वर वर एक हलकाफुलका विनोदी काव्यप्रकार वाटत असला तरी केवळ विनोद निर्मिती हे वात्रटिकेचे एकच आणि अंतिम कार्य नाही. पश्चिमी ‘लिम्...
