आजची वात्रटिका
--------------------------
भक्ती रहस्य
बुवा बाबांचे बिंग फुटले तरी,
भाविक भक्तांचे काही अडत नाही.
त्यांना कोणताही बुवा चालतो,
त्यांच्या भक्तीत खाडे पडत नाही.
परमार्थाच्या आडून का होईना,
खरा आपला स्वार्थ साधला जातो.
पहिला बाबा सोडून देऊन,
सरळ दुसरा बुवा शोधला जातो.
बुवा बाबांचा बलात्कारही,
भोळ्या भक्तांसाठी लीला असतो!
हे कुणी सांगायची गरज नाही,
भोळ्या भक्तांचा स्क्रू ढिला असतो!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
दैनिक वात्रटिका
1 फेब्रुवारी 2023
Showing posts with label भक्ती रहस्य...मराठी वात्रटिका. Show all posts
Showing posts with label भक्ती रहस्य...मराठी वात्रटिका. Show all posts
Wednesday, February 1, 2023
Tuesday, November 16, 2021
भक्ती रहस्य...मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका
------------------------
भक्ती रहस्य
आंधळे असतात, वेंधळे असतात,
भक्त फक्त भक्त असतात.
मेंदूचा वापर करायचाच नाही,
एवढे बिनडोक व सक्त असतात.
ना हम सुधरेंगे,ना बदलेंगे,
असे नाऱ्यावर नारे असतात.
जग कितीही पुढे जावो,
भक्तांचे मात्र उलटे वारे असतात.
व्वा रे वा, वा रे व्वा....अशी,
भक्तांची भक्तांना स्फूर्ती असते !
भक्त मंडळींच्या असुरी आनंदाला,
सामाजिक दुहीत भरती असते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6323
दैनिक पुण्यनगरी
16नोव्हेंबर2021
Subscribe to:
Posts (Atom)
लपाछपीचा खेळ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका -------------------- लपाछपीचा खेळ समाजकारणाआडचे राजकारण, लपविणे नेहमीच जड होत जाते. समाजकारणाआडचे राजकारण, कधी ना कधी उघड होत...
-
वात्रटिका : वर वर एक हलकाफुलका विनोदी काव्यप्रकार वाटत असला तरी केवळ विनोद निर्मिती हे वात्रटिकेचे एकच आणि अंतिम कार्य नाही. पश्चिमी ‘लिम्...

