Wednesday, February 1, 2023

भक्ती रहस्य...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

भक्ती रहस्य

बुवा बाबांचे बिंग फुटले तरी,
भाविक भक्तांचे काही अडत नाही.
त्यांना कोणताही बुवा चालतो,
त्यांच्या भक्तीत खाडे पडत नाही.

परमार्थाच्या आडून का होईना,
खरा आपला स्वार्थ साधला जातो.
पहिला बाबा सोडून देऊन,
सरळ दुसरा बुवा शोधला जातो.

बुवा बाबांचा बलात्कारही,
भोळ्या भक्तांसाठी लीला असतो!
हे कुणी सांगायची गरज नाही,
भोळ्या भक्तांचा स्क्रू ढिला असतो!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
दैनिक वात्रटिका
1 फेब्रुवारी 2023
 

No comments:

daily vatratika...3april2025