Monday, February 13, 2023

गरजवंत...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

गरजवंत

जसे येतील तसे दिवस,
गरजवंत रेटत असतो.
जसे दुसाटी असली की,
तिला तिसाटा भेटत असतो.

राजकीय क्षेत्रात तर,
ही परिस्थिती वारंवार येते!
प्रत्येकाची डळमळती नौका,
गरजवंतामुळेच पार होते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8176
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
13फेब्रुवारी 2023
 

No comments:

नेत्यांचे मित्र प्रेम...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- नेत्यांचे मित्र प्रेम राजकीय नेत्यांच्या मित्रांवरती, लोक उगीचच दात खात असतात. ते पुंडलिका वर दे...चा गजर...