Thursday, February 2, 2023

बजेटची ठसठस...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------
बजेटची ठसठस
अर्थसंकल्प कुणाचाही असो,
त्याला इलेक्शनचा वास असतो.
हेच सत्य ठसवायचा,
विरोधकांचाही अट्टहास असतो.
इलेक्शनच्या केंद्रबिंदूभोवती,
अर्थ आणि संकल्प फिरला जातो!
सामान्य माणसांचा खिसा तर,
सगळ्यांकडूनच मारला जातो!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8165
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
2 फेब्रुवारी 2023

 

No comments:

निर्धार पक्का !....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- निर्धार पक्का ! मराठी शाळांच्या बदनामीचा, सगळीकडूनच डाव आहे. साहेबीपणाचा आव आणीत, इंग्रजी शाळांकडे...