Tuesday, February 14, 2023

संधीसाधू...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

संधीसाधू

कुणा कुणाला वाटत असते,
प्रेमासाठी एक मुहूर्त असतो.
जो साधतो वेळोवेळी संधी,
तो सगळ्यांपेक्षा धूर्त असतो.

मुहूर्तवेड्या प्रेमिकांपेक्षा,
संधीसाधूच शहाणे असतात!
संधीसाधूनसाठी मुहूर्त म्हणजे,
संधीसाठी नवे बहाणे असतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8177
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
14फेब्रुवारी 2023
 

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...