Tuesday, February 28, 2023

पोटभरू...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

पोटभरू

आज जिकडे बघावे तिकडे,
सर्वत्र जातीपातीचे घोळके आहेत.
साधुसंत आणि महापुरुषांचे,
त्यांना मतलबी पुळके आहेत.

त्यांना आपला घोळका मोठा वाटतो,
जे जातीपातीच्या घोळक्यात आहेत.
आज साधूसंत आणि महापुरुष,
जातीपातीच्याच विळख्यात आहेत.

महापुरुषांच्याच विचारावरती,
आज आपली पोटे भरू लागले!
आपल्या उंच्या वाढविण्यासाठी,
महापुरुषांनाच छोटे करू लागले !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6734
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
28फेब्रुवारी2023
 

No comments:

daily vatratika...29jane2026