Monday, February 6, 2023

पोट निवडणुक...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
पोट निवडणुक
बिनविरोधाच्या डावामध्ये,
चक्क मतरांना फसवले जाते.
पोटनिवडणुकीच्या जागेवर,
घरातलेच कुणी बसवले जाते.
सोयीच्या राजकारणाला,
सोयीचीच लाट असते !
राजकीय अंधश्रद्धा पसरते,
म्हणे सहानुभूतीची लाट असते!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8169
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
6फेब्रुवारी 2023

 

No comments:

लपाछपीचा खेळ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- लपाछपीचा खेळ समाजकारणाआडचे राजकारण, लपविणे नेहमीच जड होत जाते. समाजकारणाआडचे राजकारण, कधी ना कधी उघड होत...