Monday, February 27, 2023

मातृभाषा कर्तव्य...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

मातृभाषा कर्तव्य

माय मराठीचे पुत्र आम्ही,
आम्ही माय मराठीचे पांग फेडू.
माय मराठी बनवू ज्ञानभाषा,
आम्ही मराठी नव्या जगाशी जोडू.

जुन्याशी नवे जोडताना,
आम्ही नव्या तंत्रांची कास धरू.
अभिजाततेच्या आशेबरोबरच,
जागतिक भाषेची आस धरू.

शुद्ध-अशुद्धतेचा दुराग्रह सोडू,
आपण थोडे औरस चौरस होवू.
भाषिक अहंकार व द्वेष नको,
सारे भाषिक एकतेचे गीत गावू.

मराठी बाणा,मराठी संस्कृती;
समृद्ध वारसा सदैव पाठी ठेवू!
माय मराठीचा उमटवू ठसा,
आपण सारे ' सही ' मराठी होवू!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6733
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
27फेब्रुवारी2023
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...