Tuesday, February 7, 2023

डोक्यावर नको,डोक्यात घ्या...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------------

डोक्यावर नको,डोक्यात घ्या

महापुरुषांना डोक्यात नाही,
फक्त डोक्यावर घेतले जाते.
केवळ ओझी वाहण्यातच,
आपले आयुष्य घातले जाते.

महापुरुष डोक्यावर नाही तर ;
ते डोक्यात घेण्याची गोष्ट आहे.
समजणाऱ्यांसाठी तर,
केवळ हा इशाराच बेस्ट आहे.

ज्यांनी फक्त डोक्यावर घेतले,
त्यांची बघा आज काय दशा आहे?
ज्यांनी महापुरुष डोक्यात घेतले,
त्यांच्याकडेच दिशा आणि अशा आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8170
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
7फेब्रुवारी2023
 

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...