आजची वात्रटिका
--------------------------
प्रेम शोधक
किंवा व्हॅलेंटाईन विरोधी नसतो.
एवढे मात्र नक्की आहे,
प्रत्येक प्रेमवीर प्रेमशोधी असतो.
प्रेम शोधता शोधता,
प्रेमवीर स्वतःच हरवत जातो.
प्रेमाची अडीच मुळाक्षरे,
प्रेमवीर आनंदाने गिरवत राहतो.
प्रेम नसते मिरवा मिरवी,
प्रेम हे सर्वस्वाचे अर्पण असते!
प्रेमाचे अत्युच्च टोक म्हणजे,
जिथे प्रेमामध्ये समर्पण असते!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6717
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
12फेब्रुवारी2023

No comments:
Post a Comment