Tuesday, February 21, 2023

उत्सवांचा बाजार...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

उत्सवांचा बाजार

उत्सव जेवढे दिखावू झाले,
उत्सव तेवढे विकाऊ झाले.
टिकाऊ व्हायचे राहिले बाजूला,
उलट उत्सव टाकावू झाले.

उत्सवांचे बाजार झाले,
सगळेच महात्मे बेजार झाले.
उथळता आणि सवंगतेचे
उत्सवांना साथीचे आजार झाले.

जिथे विकृतीची स्वीकृती होते,
तेच उत्सव आज स्वीकृत झाले !
विकृतीची स्पर्धा लागल्यामुळे,
दुर्दैवाने उत्सव सारे विकृत झाले !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6727
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
21फेब्रुवारी2023
 

No comments:

दैनिक वात्रटिका29एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -327 वा

 दैनिक वात्रटिका 29एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -327 वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1Qdm8vBAFqaFmdkkt4Q3...