Wednesday, February 15, 2023

चाणक्य नीती...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

चाणक्य नीती

राजकीय बदमाशीला,
मुत्सद्दीपणा म्हटले जाते.
बऱ्या वाईट मार्गाने,
मग खुशाल रेटले जाते.

राजकीय लबाडी मग,
राजकीय चातुर्य बनते.
घातकी तडजोडही मग,
शौर्य आणि धैर्य बनते.

अनैसर्गिक वाटाघाटीत,
सारे काही शक्य आहे!
थोडाही भरवसा नसणारच,
आज इथे चाणक्य आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8178
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
15फेब्रुवारी 2023
 

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...