Monday, February 13, 2023

राज्यपालांतर ..मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------
राज्यपालांतर
तुम्ही आता जाऊ शकता,
असे जरा ऐसपैस म्हणाले.
अखेर राज्यपाल पदावरती,
रमेश यांना बैस म्हणाले.
पुढच्यास बसली ठेच,
मागच्यांनी तरी शहाणे व्हावे.
पदाने मोठे असले तरी,
महापुरुषापेक्षा लहान व्हावे.
देर आये,दुरुस्त आये;
याचे राज्याला समाधान आहे !
कळसुत्री बाहुले वाटू नये,
राज्यपाल राज्याची शान आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6718
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
13फेब्रुवारी2023

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...