Thursday, February 16, 2023

सत्तेचा तमाशा...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

सत्तेचा तमाशा

सत्तेचे नाट्य वेगळे असते,
सत्तेचा तमाशा वेगळा असतो.
जसा नाट्यापेक्षा तमाशा,
कितीतरी पट आगळा असतो.

जेव्हा सगळे अंक संपतात,
तेंव्हा नाटकावर पडदा पडतो!
सत्तेच्या तमाशाचे तसे नाही,
त्यात लोकशाहीचा मुडदा पडतो!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8179
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
16फेब्रुवारी 2023
 

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...