आजची वात्रटिका
--------------------------
बनवाबनवीचे दिव्य
असंगाशी संग झाले,
बनवाबनवीत दंग झाले.
धडधाकट असणारेही,
सर्टिफाईड दिव्यांग झाले.
बनावट दिव्यांगाची,
बनवाबनवी दिव्य आहे.
टक्केवारीच्या प्रमाणाचे,
सगळे विडंबन काव्य आहे.
जिथे लागला दगड,
ते आग्या मोहोळाचे पोळे आहे!
चोरांमुळे सावांभोवतीही,
आता संशयाचे जाळे आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------
फेरफटका-8172
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
9फेब्रुवारी 2023

No comments:
Post a Comment