Saturday, February 18, 2023

कॉपीचे वास्तव...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

कॉपीचे वास्तव

कॉपी मुक्तीचा नारा सांगतो,
कॉपी अजून गेलीच नाही.
कॉपी नावाच्या रोगावरती,
अजून लस आलीच नाही.

नाही तरी कॉपी जाईलच कशी?
कॉपी जणू अमृत प्याली आहे.
आता हायटेक च्या तंत्राने,
कॉपी डिजिटल झाली आहे.

जीवघेण्या स्पर्धेमध्ये,
प्रत्येकाला कॉपी आधार वाटतो !
म्हणूनच कॉपीचा व्यवहार,
आज रोख उद्या उधार वाटतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8180
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
18फेब्रुवारी 2023
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...