Saturday, February 11, 2023

गायीचे मनोगत...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

गायीचे मनोगत

व्हॅलेंटाईन डे च्या पार्श्वभूमीवर,
केवढे मोठे वादळ उठले गेले.
लोकांनी केलेल्या विरोधामुळेच,
मी तर बाई मिठ्यातून सुटले गेले.

व्हॅलेंटाईन डे प्रेमींचा मार्ग,
आदेश मागे घेऊन सोपा केला!
एवढे तरी खूप बरे झाले,
बैल जायच्या अगोदर झोपा केला!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8173
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
11फेब्रुवारी 2023
 

No comments:

daily vatratika...29jane2026