Tuesday, February 14, 2023

प्रेमळ निरीक्षण...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

प्रेमळ निरीक्षण

एकदा प्रेमात पडले की,
कुणी कुणी आंधळे होतात.
कुणी कुणी गोंधळे होतात,
कुणी कुणी तर वेंधळे होतात.

एकदा प्रेमात पडले की,
वास्तवाचे काही भान रहात नाही.
तनावरती आणि मनावरती,
कसलाच काही ताण रहात नाही.

ज्याला मिळते;त्यालाच कळते,
प्रेम गोडी गोडीने छळत असते.
प्रेमाच्या प्रत्येक क्षणाक्षणाला,
प्रेम अधिक नव्याने कळत असते.

प्रेमात पडावे की नाही?
कुणासमोर प्रेमळ पेच आहेत!
ज्यांना मिळते सच्चे प्रेम,
खरे भाग्यवान तर तेच आहेत!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6720
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
14फेब्रुवारी2023
 

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...