Thursday, February 9, 2023

गेट सेट गो...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------

गेट सेट गो...

नवा आदेश आलाय,
तुम्ही आनंदाने शिटी मारा.
'व्हॅलेंटाईन डे' च्या मुहूर्तावर,
आता गाईला मिठी मारा.

विदेशी 'व्हॅलेंटाईन डे' ला,
'काउ डे' हा उपाय देशी आहे!
गुलाब नको चारा गोळा करा,
सांग आयडिया कशी आहे?

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6715
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
9फेब्रुवारी2023
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...