Friday, February 17, 2023

कोर्ट प्लॅन...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

कोर्ट प्लॅन

न्यायालयाचा आदर करावा,
या विचाराशी कधीच फारकत नाही.
निवडणुकांच्या ऐवजी कोर्टातून,
सरकार बसवायला हरकत नाही.

केवळ आम्हालाच नाही तर,
कुणालाही हा प्लॅन सुचू शकतो.
निवडणुकीतल्या पैशाबरोबर,
सर्वांचा किंमती वेळही वाचू शकतो.

त्यासाठी सरकार बनवण्याचा दावा,
दर पाच वर्षांनी ठोकला पाहिजे !
घटनाबाह्य सरकार स्थापण्याचा,
असा कोर्ट प्लॅन आखला पाहिजे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6722
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
17फेब्रुवारी2023
 

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...