Sunday, February 19, 2023

लोकशाहीची गळचेपी...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

लोकशाहीची गळचेपी

हुकूमशाही आणि बेबंदशाहीत,
आपली लोकशाही हरपली आहे.
घराणेशाहीची कीड तर,
लोकशाहीत सर्वत्र झिरपली आहे.

बाबुशाही आणि खाबूशाहीशी,
आपल्या लोकशाहीची टस्सल आहे.
गुंडशाही आणि पुंडशाही म्हणते,
आमचीच तर शाही अस्सल आहे.

बहुमताचे आकडे दाखवीत,
तोऱ्यामध्ये आज झुंडशाही आहे !
दंड आणि अहंगंड थोपटीत,
शिरजोड आज बंडशाही आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6724
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
19फेब्रुवारी2023
 

No comments:

सोशल स्टेटस ......प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- सोशल स्टेटस आजच्यासारखा राजकीय स्वार्थ, आम्ही यापूर्वी कधीच पाहिला नाही. शुभेच्छासारख्या शुभेच्छांनासुद्...